कोरोना व्हायरसने देशभरात थैमान मांडले आहे. या व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी बरेच सेलिब्रेटी पुढे सरसावले आहेत. जनजागृतीसोबतच काही सेलिब्रेटींनी आर्थिक सहाय्य देखील केली आहे. काही कलाकारांनी पीएम केअर फंडात निधी दिला आहे तर काहींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. अनेक सेलिब्रिटींनी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स दिलेत. अभिनेता अक्षय कुमारने देखील दिवस रात्र कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिसांना २ कोटींची मदत केली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. त्यांनी अक्षयचे आभार देखील मानले आहेत. शहराचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या मुंबई पोलिसांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी आपले योगदान महत्त्वाचे ठरेल', असे त्यांनी ट्विट केले आहे.
#lokmatcnxfilmy #akshaykumar #LokmatNews
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber